कळंब (राजेंद्र बारगुले ) – जनकल्याण अर्बन को-ऑप बँक लि. कळंब या बँकेचा २०२३ -२४ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा – ताळेबंद तयार झालेला असुन बँकेने या वर्षामध्ये चांगली भरभराट केली आहे. बँकेची प्रगती अतिशय समाधानकारक झालेली आहे. बँकेचे भागभांडवल मार्च २०२३ वर रु.३४०.३९ लाख होते त्यामध्ये ११.०८% नी वाढ होऊन ते रु.३७८.०९ लाख झाले आहे. बँकेच्या ठेवी गतवर्षी पेक्षा १३.६६% नी वाढून रु.७१२६.५३ लाख इतक्या झाल्या आहेत. कर्जामध्ये २३.४७% नी वाढ होऊन कर्ज रु.४८४८.७७ इतके वाटप झाले आहे. तसेच CD RATIO ६८.०४% आहे यावर्षी बँकेस रु. १,८१,७०,०००/- (रु. एक कोटी एक्याऐंशी लाख सत्तर हजार) ढोबळ नफा झालेला आहे. बँकेचा NET NPA हा ० % आहे. जनकल्याण बँकेची स्थापना कळंब सारख्या छोट्या तालुक्यामध्ये २७ वर्षापूर्वी झालेली असुन बँकेचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यामध्ये विस्तारलेले आहे. बँकेच्या एकूण ७ शाखा कार्यरत असून नुकतीच ७ वी शाखा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कार्यरत आहे. बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या FSWM निकषांची पूर्तता केलेली असून आणखी नवीन शाखा विस्ताराचे धोरण बँकेच्या संचालक मंडळाने अवलंबिले आहे. जनकल्याण बँकेने केवळ संख्यात्मक वाढीवर भर न देता गुणात्मकता व नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब यावर भर देवून IMPS , MOBILE BANKING व UPI सेवा सुरु केल्या आहेत. लवकरच QR CODE , NET BANKING व BBPS या सुविधा ही येत्या २ ते ३ महिन्यात चालु करीत असल्याचा मानस बँकेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
चेअरमन उमेश कुलकर्णी यांनी बँकेचे सर्व सभासद , ग्राहक, ठेवीदार, कर्जदार यांचे आभार व्यक्त करून जनकल्याण बँकेच्या या यशस्वी वाटचालीत त्यांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा व मोलाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या सर्वांच्या सदिच्छा व सहकार्य या पुढेही असेच बँकेच्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर