धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.03 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 219 कारवाया करुन 1,67,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)राजेंद्र कृष्णाथ दिंडोळे, वय 49 वर्षे, रा. चिलवडी ता. जि. धाराशिव हे दि.03.04.2024 रोजी 17.20 वा. सु. चिलवडी झोपडपट्टी येथे अंदाजे 900 ₹किमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)अलिम बशीर लदाफ, वय 50 वर्षे, रा.हमीद नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.03.04.2024 रोजी 18.20 वा. सु. उमरगा ते आळंद जाणारे कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर कसगी चेकपोस्ट येथे अंदाजे 5,400 ₹किमतीची 65 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.03.04.2024 रोजी 15.35 वा. सु. भुम पोठा हद्दीत चिंचपुर ढगे ते वालवड जाणारे रोडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)बुद्दीन मोहसिन खॉ पठाण, वय 33 वर्षे, 2) संदीप रामभाउ ढगे, वय 33 वर्षे, 3) विश्वनाथ भिमराव शिंदे, वय 36 वर्षे, 4) सुदर्शन नवनाथ विधाते वय 45 वर्षे, 5) सुधिर मुकुंद ढगे वय 33 सर्व रा. चिंचपुर ढगे ता. जि. धाराशिव हे सर्वजन 15.35 वा. सु. चिंचपुर ढगे ते वालवड जाणारे रोडलगत तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 42,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)शिवकुमार सिद्राम वाकळे, वय 40 वर्षे, रा. महादेव नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.03.04.2024 रोजी 14.05 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 के 239 ही भिमनगर रोउ पोलीस स्टेशन मुरुम गेटजवळ रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-महादेव बाळू नन्नवरे, वय 34 वर्षे, रा. अंबेजवळगे ता. जि. धाराशिव यांचा मित्र आनंद क्षिरसागर कोलकत्ता येथे आर्मीमध्ये नोकरीस असुन त्याचे घराचे देखभालीचे व साफसफाईचे काम फिर्यादी हे करत असुन आनंद क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 03.04.2024 रोजी 00.30 ते 09.00 वा. सु. तोडून आत प्रेवश करुन घरातील टी.व्ही., होम थेटर, व्हीवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम 50,000 ₹ असा एकुण 68,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे महादेव नन्नवरे यांनी दि.03.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रशांत विश्वनाथ गरड, वय 39 वर्षे, रा. खानापुर ता. जि. धाराशिव ह.मु. उंबरे कोठा ता. जि. धाराशिव यांच्या भावाचे नावावर असलेली हिरो होन्डा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एस 5311 चेसी नं MBLHA10EJ9HF48201 व इंजिन नं HA10EA9HF96472 असा असलेली अंदाजे 20,000₹ किंमतीची ही दि. 05.03.2024 रोजी 17.30 ते 22.15 वा. सु. पंचायत समिती पार्कीग भागामध्ये धाराशिव येथुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे प्रशांत गरड यांनी दि.03.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ अपहरण.”
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) शिवशंकर इंगळे, रा. केज ता. केज जि. बीड, 2) संजय पवार, 3) इंडिका व्हिस्टा गाडीचा ड्रायव्हर दोघे रा. गेवराई जि. बीड यांनी दि. 28.03.2024 रोजी 15.00 वा. सु. मोघा खुर्द ते मोघा बु गावचे मध्यभागी असलेले लक्ष्मी मंदीराजवळ फिर्यादी नामे- बाजीराव दिनकर भोंडवे, वय 30 वर्षे, रा. मोघा खुर्द ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी वाळूचे राहिलेल्या पैशाचे कारणावरुन उचलून नेवून चाकूने दोन्ही हातावर तोंडावर सिटवर वार करुन जखमी केले. व लोहाटा गावाचे बाहेर रस्त्याचे बाजूला सोडून दिले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बाजीराव भोंडवे यांनी दि.03.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 363, 365, 324, 323, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) गंगाराम अनिल हजारे, 2) अनिल हजारे, 3) विनायक पैळ(ममड्या) सर्व रा. मातंगनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 03.04.2024 रोजी 15.00 वा. सु. नविन बस स्थानक तुळजापूर समोर फिर्यादी नामे- सुनिल मरगु पवार, वय 34 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिण्यास पैसे देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन ऑफीसची तोडफोड केली. तसेच फिर्यादीचा भाउ सोमनाथ पवार हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन हातातील चावीला असलेल्या चाकून मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनिल पवार यांनी दि.03.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 427, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
भुम पोलीस ठाणे : मयत नामे- दत्ता रमेश राउत, वय 20 वर्षे, सोबत मित्र महेश पिंपळे, शाम शिंदे रा. बावी ता. भुम जि. धाराशिव हे दि.16.03.2024 रोजी 12.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 6954 वर बसून भुम ते बावी गावाकडे येत होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 12 जेएन 4906 चे चालकाने त्याचे ताब्यातील टॅक्टर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून दत्ता राउत यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात दत्ता राउत हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर त्यांचे मित्र महेश पिंपळे, शाम शिंदे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश रोहीदास राउत, वय 46 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.03.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279,337, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी