February 10, 2026

रोहन जाधव यांची सहाय्यक संचालकपदी निवड

  • धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्य सेवा स्पर्धा परीक्षा २०२२ चा निकाल ता.२० मार्च २०२४ रोजी जाहीर झाला आहे .
    सदर परीक्षेतून धाराशिव स्थित ( मूळ गाव औराद ता.उमरगा ) येथील रोहन शिवाजीराव जाधव यांची सहाय्यक संचालक , महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ( वर्ग -1) या पदावर आयोगाने निवड केली आहे.
  • रोहन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण नूतन प्राथमिक विद्या मंदिर, धाराशिव येथे तर माध्यमिक शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव येथे झाले आहे .तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेतून राजर्षि शाहू महाविद्यालय, लातूर येथून झाले आहे. तसेच त्यांनी एम.बी.ए.फायनान्सची पदवी संपादन केली आहे.
  • रोहन जाधव यांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड आहे .इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांनी घवघवीत यश मिळविले होते. एकंदरीत संपूर्ण शिक्षण काळात यशाला गवसणी घालत शिक्षण पूर्ण केले.
  • लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सन २००६ ते २००८ धाराशिव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव यांचे चिरंजीव आहेत.
error: Content is protected !!