धाराशिव – जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी म्हणून नुकतेच रुजू झालेल्या अशोकराव पाटील यांचा धाराशिव राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अतिशय उत्साही, कर्तव्य तत्पर, विद्यार्थी विकासाची तळमळ असलेले धाराशिव जिल्ह्यातील सुपुत्र जिल्ह्याला शिक्षणाधिकारी लाभल्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अशादायक चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहॆ. पदाधिकाऱ्याशी बोलताना त्यांनी प्रत्येक शनिवार इंग्लिश डे म्हणून ओळखला जावा, विदयार्थी अध्ययन स्तर उंचवावा, विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करूयात अशी इच्छा व्यक्त केली. नवीन शिक्षकांच्या नेमनुका देताना त्यांच्या चेहऱ्यावर असेलेल्या समाधानाबद्दलही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधि. महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांच्या नेतृत्वात राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, जिल्हाकार्याधक्ष दीपक हजारे, सचिन देवगिरे, सुधीर जाधवर, विशाल जाधव, सुहास दराडे, सुवर्णा घोळवे, ताठे, येवतीचे केंद्र प्रमुख अनंत हाके, गौतम रणदिवे,अमोल पांचाळ आदी पदाधिकाऱ्यांनी शाल व बुके देऊन अशोकराव पाटील यांचा सत्कार केला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले