February 10, 2026

धर्मादाय आयुक्त रुग्णालयाच्या जिल्हा कमेटीवर विजयकुमार सांगळे यांची नियुक्ती

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून विजयकुमार सांगळे यांची निवड करण्यात आली आहे.
    महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अअ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका (पीआयएल) क्रमांक ३१३२/२००४ मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरीता योजना तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्चीत खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे. मात्र असे होत नसल्यामुळे विधी व न्याय विभागाने जिल्हास्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. विधी व न्याय विभागा दिनांक १४ मार्च रोजी शासन निर्णय काढाल आहे. सदस्य म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार ज्ञानराज चौगुले असणार आहेत. तर सामाजिक क्षेत्रातुन नामनिर्देशित सदस्य म्हणून विजयकुमार सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!