मुंबई – पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेनेच राज्य आणि राष्ट्र मोठे होते, असे भावपूर्णविधान ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील तात्यासाहेब सोनवणे यांनी महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहातील (NCPA) भव्य सभागृहात सन्मानित केल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. गेली २९ वर्ष सामाजिक, शैक्षणिक,साहित्य,वैद्यकीय क्षेत्रात,असह्य रूग्ण,असह्य विद्यार्थी,आदिवासी बांधवांसाठी काम करताना अनेक कटू अनूभव वाट्याला आले खरे परंतु सकारात्मक दृष्टीकोन,आणि प्रेरक मानवमुक्तीचे प्रणेते क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाज्वल्य जीवन संघर्ष पावला पावलावर प्रेरणा देत राहीला. धनंजय कीर लिखीत डॉ. यांचे चरित्र पुस्तक,साहित्यशिरोमणी प्र.के.अत्रे यांचे आत्मचरित्रातील महानवाची अंत्ययात्रा, गोलमेज परिषद, बहिष्कृत भारत,मूकनायक,प्राब्लेम ऑफ दी रूपी, चवदार तळयाचा संघर्ष,कोरेगाव भीमा शौर्य दिनाची सलामी, कसबे तडवळे महार मांग वतनदार परिषद,अन् त्यांनी आपल्या देशाला दिलेले सार्वभौम संविधान,आमच्या जीवनसंघर्षात प्रेरणादायी ठरले.दीक्षाभूमी,चैत्यभूमीची माती, माझी आत्मकथाच बनली. समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर चैत्यभूमी गाठली. अरबी समुद्र खवळलेला नव्हता.वंदामी भंतेजी म्हणत महामानवाला विनम्र अभिवादन केले.समाजभूषण पुरस्कार मानपत्र प्रज्ञासुर्याच्या स्फूर्तीस्थळावर ठेवून,गुडघे टेकून बुद्धमं नमामी धम्मं नमामी, संघ नमामी म्हणत भीमरावम्ं सरामी भीमस्तुती वदली.छ.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून समाजसेवा करणाऱ्या समाजसेवक तात्यासाहेब सोनवणे यांनी आपला जीवन प्रवास आनंदाश्रूंनी सांगितला. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,लोकनेते आ. किसन कथोरे , केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले,केंद्रीय मंत्री ना.कपिल पाटील, वामनशेठ म्हात्रे,आ. डॉ.बालाजी किणीकर,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,शरदजी तेली, सावंत साहेब,निवड समिती समन्वय मंत्रालय,संभाजी शिंदे,संजयदादा भोईर,ज्ञानेश्वर घोरपडे,सागरशेठ घोरपडे,उत्तमशेठ विशे, गोपाळ लांडगे,ॲड.मनोज वैद्य,रामभाऊ पातकर,राजनदादा घोरपडे,कॅ.पराग पातकर,प्रा.रमेश बुटेरे सर, उल्हास(भाई) आंबवणे,डाॅ.शंकर पोवार,तुषार प्रभुदेसाई,मेघाताई गुरव, सौ. निशाताई घोरपडे,किरण भोईर,सौ.मिनल मोरे मॅडम,रोहनशेठ पाटील, प्रकाश (धर्मा) दादा पाटील, डॉ. शाहू रसाळ, डॉ.व्यंकट सोनवणे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य सचिव सुमंत भांगे साहेब ,आयुक्त ओमप्रकाश बकोरियाजी, रविंद्र कदम पाटील,बी.डी.कीरवे,विवेक अस्वले,आयुक्तालय पुणे,सामाजिक न्याय उपसचिव गोरवे साहेब,अवर सचिव खैरमोडे साहेब,ॲड.केवल उके, सदस्य सचिव सामाजिक न्याय तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीज,महासचिव महाराष्ट्र राज्य, समाजकल्याण ठाणे गोसावी,सहा.पो.उपनिरीक्षक कल्याण ढोकणे, आ. नरेंद्र पवार,सेवानिवृत्त पो. अधिकारी शामराव पवार,सा.साक्षी संपादक सुभाषजी घोडके,सोशल मिडिया मिलिंद धारवाडकर,डाॅ.नागेश बोरगावकर,दिलिप आदमाने, एनडीएमजे राज्य निरीक्षक,लोकपालक प्रदीपजी रोकडे,सोमनाथ ढगे सहसचिव एनडीएमजे मराठवाडा, शैलेश महाजन, सुर्यवंशी,यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, पुरस्कार प्रेरणा देतात. प्रेरणेनेच राज्य, राष्ट्र मोठे होते हे आवर्जून सांगितले. यातून नवी पिढी घडत असते.दर्जेदार शिक्षणासाठी शाळा व शहरात रक्तपेढी,सुसज्ज चांगले पन्नास बेडचे रूग्णालय लोकप्रतिनिधींनी उभे करायला हवे असेही आवर्जून सांगायला विसरले नाही..!
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती