- वेद शैक्षणिक संकुलात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान उत्साहात संपन्न
- कळंब (महेश फाटक ) – आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून प्रथमतःस्वतःचे ध्येय निश्चित केले पाहिजे तसेच कुठलीही गोष्ट अवघड नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कार्य केले असता कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते असे प्रतिपादन डॉ.संजीवनी रमेश जाधवर यांनी केले.
धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक महिला दिनानिमित्त दि.११ मार्च २०२४ रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान समारंभ प्रा.मोहिनी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमास ओम दातांचा दवाखान्याच्या डॉ.संजीवनी जाधवर,कॅनव्हास इंटरनॅशनल स्कुलच्या आशा रवी नरहिरे, स्वामीनी पार्लर सेंटरच्या मनीषा बाळासाहेब कळंबे (शिंदे),संत ज्ञानेश्वर निराधार बालकाश्रमच्या संचालिका सरस्वती महादेव आडसूळ,आरोग्यसेविका रेखा तपिसे,निदेशिक कोमल मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी तर प्रास्ताविक निदेशिका कोमल मगर व आभार निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी मानले.
या कार्यक्रमास भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सागर पालके,निदेशक विनोद जाधव,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तर सांगता ही राष्ट्रगीताने झाली.- # आधुनिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षणही विद्यार्थ्यांनी आत्मसात करून २१ व्या शतकातील आदर्श युवक बनावे
– सौ.सरस्वती आडसूळ
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन