वाशी ( माधवसिंग राजपूत ) – बळीराम जगताप गुरुजी यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान व त्यांना संस्कारक्षम बनविण्याचे तर पत्रकार म्हणून लोकशिक्षण व समाज शिक्षणाचे, वंचितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे, वयाची ८० वर्ष पूर्ण करीत आहेत ( सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा ) सेवानिवृत्तीनंतरही पत्रकारिता व ज्येष्ठ नागरिकांसाठी ( तालुका सचिव वाशी) त्यांचे कार्य सुरू आहे त्यांच्या या कार्यातून आम्हाला सतत प्रेरणा मिळत राहते असे गौरव उद्गार शिवाजी फाटक जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक धाराशिव यांनी बळीराम जगताप गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, जेष्ठ नागरिकांसाठी भोजन आदी समाज उपयोगी उपक्रम घेण्यात आले अजिंक्य विद्यालय वाशी येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण गंभीरे कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी हे होते मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प महादेव महाराज अडसूळ जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ धाराशिव ,नवनाथ धुमाळ सेवानिवृत्त अधिव्याख्याते धाराशिव, ह. भ .प . शंकर महाराज थोबडे विशाल पवार अध्यक्ष अजिंक्य शिक्षण संस्था वाशी, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ लगाडे ,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत ,एम आय मुजावर, शहाजी चेडे, शोयब काझी, लगाडे यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप गुरुजी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बळीराम जगताप गुरुजी यांनी आपल्या भाषणात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेकांचे सहकार्य मिळाले असे सांगून सत्कार व शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल आभार व्यक्त केले वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, जेष्ठ नागरिकासाठी सुरुची भोजन आधी कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन व आभार हरून काझी तालुकाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ वाशी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना विश्वेकर यांनी केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन