कळंब – वैद्यकीय अधिकारी या पदावर पोहोचण्यासाठी निश्चितच माझ्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले म्हणून माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांनाच जाते असे गहीवरून हृदयपूर्वक उद्गार कु.डॉ.स्वप्नाली घोडके यांनी सत्कारास उत्तर देतानी काढले.
धाराशिव तालुक्यातील खेड येथील कु.डॉ.स्वप्नाली प्रकाश घोडके यांची तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून दिनांक मार्च २०२४ रोजी नियुक्ती असल्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था कळंबच्या वतीने डॉ.स्वप्नाली यांचा साक्षी कोचिंग क्लासेसच्या हॉलमध्ये ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचे आयोजन दिनांक ८ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले होते. या प्रसंगी संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत आदींनी आपल्या मनोगतातून जागतिक दिनाचे महत्त्व विषद करत डॉ.स्वप्नाली यांच्याकडून प्रामाणिकपणे कर्तव्याचे पालन करण्याची आशा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. अध्यक्षी भाषणातून ह.भ.प महादेव महाराज यांनी डॉ.स्वप्नाली यांना घडवण्यात त्यांच्या आई-वडिलांचे खूप मोठे योगदान असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश घोडके यांनी केले तर आभार पिंपळगाव (डोळा) येथील अंगणवाडी सेविका सौ.पल्लवी घोडके यांनी मानले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे,व्हॉईस ऑफ मीडियाचे दै.धाराशिव नामा प्रतिनिधी सिकंदर पठाण,संघर्ष घोडके,उत्कर्ष घोडके,थोडसरवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापिका आयु.मंगल आवटे-घोडके,खादीग्रामोद्दोग संघाच्या संचालिका आयु.रंजना घोडके,आयु.रुपाली घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले