August 9, 2025

मासेमारीसाठी बोली लिलाव पध्दतीने;इच्छुकांकडून १५ मार्चपर्यंत प्रस्ताव मागविले

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हातील ५०० हेक्टरखालील जलक्षेत्र असलेल्या बाणगंगा मध्यम प्रकल्प (सरासरी जलक्षेत्र ८९.६५ हेक्टर) हा पाटबंधारे तलाव मासेमारीकरिता ठेक्याने देण्यासंदर्भात शासनाने सन २०१९ मध्ये निर्णय घेतला आहे.या निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेअंतर्गत (बोली) जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीची सभा संपन्न झाली. सभेमध्ये जिल्हातील बाणगंगा मध्यम प्रकल्प हा पाटबंधारे तलाव जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावीत आहे.
    लिलावातील तलावाचे नांव, न्युनतम ठेका रक्कम,तलाव ठेका सुरक्षा अनामत रक्कम व वार्षीक इष्टतम मत्स्यबोटुकली संचयन किंमतीच्या १० टक्के रक्कम तसेच अटी व शर्ती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,धाराशिव यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध आहे.तरी पात्र संस्थांनी बोली प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
    परंतु भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीसाठी सुधारित निकषानुसार ५०० हेक्टरच्या आतील एखादया तलावावर नोंदणी असलेली संस्था काही कारणास्तव काळया यादीत किंवा बंद असल्यास लगतच्या पाच किमी अंतराच्या आतील संस्थेचे त्या तलावावर त्या कालावधीकरिता निर्धारण करण्यात यावे.या तरतुदीनुसार जर पात्र संस्थेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा परिस्थीतीत बाणगंगा मध्यम प्रकल्प हा पाटबंधारे तलाव बोली लिलावाव्दारे ठेक्याने न देता शासनाच्या तरतुदीनुसार ठेक्याने देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
    बोली लिलावात भाग घेण्यास ईच्छुक जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थानी अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता १५ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, धाराशिव या कार्यालयास सादर करावे.
error: Content is protected !!