March 26, 2026

पारा येथून चोरट्यांनी ट्रॉली सहित ट्रॅक्टर केले लंपास

  • धाराशिव (जयनारायण दरक)-
    वाशी तालुक्यातील पारा येथे दि.29 फेब्रुवारी रात्री पारा येथील गोपाळनाथ मठाच्या समोर लावलेले विशाल शहाजी लोकरे यांचे महिंद्रा सरपंच 575 ट्रॅक्टर ट्रॉली सहित चोरट्यांनी रात्री 12.30 च्या आसपास लंपास केले. त्यामुळे आता नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .तसेच पारा गावातील प्रमुख मार्गांवर ग्रामपंचायतने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी होत आहे.
    गोपालनाथ मठ हा पारा बस स्टँड ला लागुन आहे तरीदेखील चोरट्यांनी एवढे ट्रॉली सहित ट्रॅक्टर चोरून नेल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .पारा येथुन वाहन चोरीची एवढी मोठी घटना पहिलीच आहे.एवढे मोठे वाहन लंपास कसे केले.यावर चर्चांना उधाण आले आहे. याचे मालक विशाल शहाजी लोकरे यांनी तात्काळ वाशी पोलीस स्टेशन गाठून सदरील घटनेची तक्रार दिली आहे. तरी पुढील तपास चालू असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.
  • @ पारा येथील ग्रामसुरक्षा दल नावालाच – वाशी तालुक्यातील पारा येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील तरुणांना घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केले होते. सध्या हे सुरक्षा दल गावामध्ये गस्त घालत नसल्यामुळें चोरांना वाव मिळाला आहे. तरी प्रशासनाने ग्रामसुरक्षा दल स्थापन करुन रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
error: Content is protected !!