कळंब (महेश फाटक ) – अ.भा.मराठी साहित्य परिषद शाखा कळंब, हेल्दी ग्रुप व कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा दिवसा निमित्त कविसंमेलन व आश्रुबा कोठावळे लिखित बाल कविता संग्रह शब्दपेरणी बालमनावर या वर चर्चा करण्यात आली. दोन तास चाललेल्या या भारदार कार्यक्रमात पंधरा निमंत्रित कवींनी आपल्या रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कविसंमेलनाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.पुरुषोत्तम पाटील हे होते.तर पाहुणे म्हणून शीघ्र कवी प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर ,प्रा.डॉ.शोभा पाटील,राजेंद्र बिक्कड ,प्रा.जगदीश गवळी, पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे उपस्थित होते. सुरुवातीस दिप प्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कवी संमेलनाच्या सुरुवातीस डॉ.शोभा पाटील यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताने सुरुवात केली. तर दिलीप मोरे यांनी माय मराठी वीर पुत्र मी ही कविता सादर करून मराठीची महती गायली. तसेच सौ.अंजली चाळक यांनी, मला ती ही आई व्हायचंय.. या कवितेत मुलीला समोर बसवून लांब सडक केसात तेल माखून, मधून भांग पाडून, तिची लांब सडक वेणी घालायची आहे. आई व मुलीचं नातं जपणारी कविता सादर केली. संतोष लिमकर यांनी नव्या युगात किती निरर्थक आयुष्य जगतो आपण, समोर पडलेला पेपर वाचतो आपण कोणत्याही घटनेने विचलित न होता ही कविता सादर केली. प्रा.महादेव गपाट यांनी, ओळखलं का सर मला… ही कविता सुंदर आवाजात सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांनी ‘ लिहिणाऱ्या तत्व स्पर्श हातासम, वाचणारे ज्ञान चक्षु होऊ, हो जाऊनी ग्रंथ दुनियेत इतिहासाचा शोध घेऊ, ही कविता सादर केली. अश्रुबा कोठावळे यांनी पहाटेच्या ग पारी, येतो ओवीचा आवाज,करून सडा सरवण, होई रांगोळीचा साज. जात नावाची कविता सादर केली. सोपान पवार यांनी पाऊस ही गेय कविता सादर केली. तसेच नवोदित कवी हर्षवर्धन पाटील, प्रितम वेदपाठक, रमेश शिंदे यांनी कविता सादर केल्या. प्रा.जगदीश गवळी यांनी कविता सादर करून, शब्दपेरणी बालमनातील या कविता संग्रहाचे वाचन केले. सौ.निन्हाळ यांनी देव नाही देव्हाऱ्यात हे भजन सुंदर आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. शीघ्र कवी प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर यांनी मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे, या बद्धल उदाहरणासह माहिती दिली, तर आजच्या मुलींना जात्या वरच्या ओव्या तर मुलांना मराठी भाषेतील गावरान शिव्या यायला पाहिजेत. त्यांनी त्यांच्या कवितेतून कवीनी सादर केलेल्या कवितांचा सार घेवून सर्वांचे कौतुक केले.मराठी भाषा जपण्या साठी असे कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे मत भवर यांनी व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले.हे कवी संमेलन डॉ. पाटील यांच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या सभागृहात घेण्यात आले. कवी संमेलन चे बहारदार सूत्र संचलन बापू भंडारे यांनी केले तर सतीश टोणगे यांनी आभार मानले.डॉ.शोभा पाटील यांच्या पसायदानाने सांगता झाली.या वेळी पत्रकार शितलकुमार घोंगडे ,रमेश अंबिरकर ,माधवसिंग राजपूत, सलमान मुल्ला, संभाजी गिड्डे, शिवाजी सावंत,हेल्दी ग्रुप चे सदस्य, पद्माकर माने, उत्तम सावंत, विष्णु मस्के,उद्धव काळे,सतीश डिकले,निळकंठ वाघमारे,पप्पू मडके,दत्तात्रय गाडे ,भाऊसाहेब देशमुख, नवनाथ आडसूळ हेल्दी ग्रुप सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,बापु भंडारे,बाळासाहेब कांबळे,दिनकर बाकले,पोपट साळवे,दादाराव पवार,प्रशांत निन्हाळ,वैभव कोठावळे,सतीश तोडकर,विठ्ठल पुट्टेवाड, राजेंद्र लोकरे या सर्वांनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात