August 9, 2025

बंडु ताटे यांना सुभाष चंद्रबोस जीवन गौरव पुरस्कार सन्मानित

  • कळंब  (माधावसिंग राजपूत ) – महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन (म.रा.) यांच्या वतीने दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथील पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय गिरी उप मुख्य आधिकारी जि.प लातूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिसखान पठाण (असोशियन चे प्रदेश अध्यक्ष),हभप महादेव महाराज आडसुळ (जेष्ठ नागरीक महासंघ जिल्हा अध्यक्ष धाराशिव ),सुभाष
    घोडके (सा.पावन ज्योत चे संपादक ),साहेबअली सौदागर ( प्रावक्ता मुस्लीम विकास परिषद) व उषाताई धावारे (मराठवाडा आध्यक्ष असोशियन म.रा) ,गंगासागर ढवळे लातूर (जिल्हा आध्यक्ष असोशियन) चंद्रकांत वायाळ,सिद्धार्थ कवटेकर व सुफी सय्यद शमशोद्दीन महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन चे संस्थापक सचिव हे उपस्थित होते .
    या प्रसंगी दत्तात्रय गिरी यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी पुरस्कारासाठी काम करू नये, उत्तम आणि समाज उपोयोग व राष्ट्रीय बधुत्व जपण्याचे कार्य केले व समाजातील तळागाळातील लोकांच्या साठी कार्य करणाऱ्या लोकाचां सत्कार होतोच अशा प्रकारे मार्गदर्शन केले व सर्व पुरस्कार मानकरी यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.त्यानंतर हभप महादेव महाराज आडसुळ यांनी आपल्या मार्गदर्शनात गेली 20 वर्षापासून महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन हे तळागळातील विविध क्षेत्रा मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान करत आहे.त्याबददल या अशोशियन चे अभिनंदन केले.यावेळी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कला,क्रीडा शिक्षण , संस्कृतीक औद्योगिक ‘ , सामाजिक व इतर क्षेत्रातील 20 मान्यवराचा नेताजी सुभाषचंद्र बोस जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप मानपत्र , ट्रॉपी शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्र असोशियन ( म.रा ) सर्व पराधीकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्र गिताने सुरु केले आणि कार्यक्रमाचे सुत्र संचालन कुमारी अंकिता माकणे यांनी केले व आभारप्रदर्शन सुरज मांदळे यांनी केले.
error: Content is protected !!