August 9, 2025

मध्यरात्रीस दुकानांवर दगडफेक; व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण

  • कळंब (महेश फाटक ) – शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजीस मध्यरात्रीच्या वेळी दुकान फोडून लुटमारीच्या उद्देशाने पवार मेडिकल ह्या केमिस्ट व ड्रेगिस्ट दुकानावर दगडफेक करून बोर्डाचे नुकसान केले आहे.
    या निमित्ताने शहरातील चोरट्यांचा “रात्रीस खेळ चाले” प्रकारामुळे शहर पोलिसांच्या गस्तीवर संशय व्यक्त होत असून व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    या पवार मेडिकल दुकानाचे मालक नर्सिंग प्रमोद पवार यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर भारतीय दंडसंहिता ४२७ कलम हा अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
error: Content is protected !!