धाराशिव (जिमाका) – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरीता योजनांचा महामेळावा गुरुवार, 7 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता नगर परिषद परिसरातील नाट्यगृह प्रांगण, धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा ए.एस.शेंडे व वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य