March 26, 2026

शहरात देवशिल्पी प्रभुविश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

  • कळंब (महेश फाटक ) –  विश्वकर्मा संघटनेच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती राधेश्याम मंगल कार्यालय येथे दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी उत्साह साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण ,दीप प्रज्वलन महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव (दादा) पांचाळ हे होते.त्यांनी आपल्या भाषणात 12 बलूतेदार कारागिरांचे व्यवसाय बंद पडत असून यामुळे या घटकाला आर्थिक संकटाला तोड द्यावे लागत आहे.यासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे असून काळाप्रमाणे बदल स्वीकारले पाहिजेत विशेषतः महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गृह उद्योग सुरू करावेत असे असे विचार व्यक्त केले.उपस्थित प्रमुख पाहुणे ह. भ.प.महादेव महाराज अडसूळ, प्रकाश काका भडंगे,कल्याण कुंभार,बप्पा लोहार, माधवसिंग राजपूत,दीपक राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले.
    आपल्या प्रास्ताविक भाषणात सचिन डोरले यांनी विश्वकर्मा समाजाचे भारतीय संस्कृतील महत्वाचे स्थान यांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी बब्रुवान पांचाळ, कमलाकर नागटिळक, महादेव पांचाळ,दिलीप पांचाळ, निलेश पांचाळ,संतोष लोंढे.संतोष भांडे ,मेजर माधव पांचाळ,दीपक माळी ,शंकर पांचाळ,नागनाथ मौरे ,समाधान पांचाळ,राम पांचाळ,लिंबराज पांचाळ ,सुरेश डोरले सर,नारायन क्षिरसागर,महादेव राऊत, नागटिळक पांडुरंग लोकरे,आशोक मौरे,संजय पांचाळ,राजु लोहार,राम लोहार,संदिप कळसाईत,आमोल कळसाईत,रामदास गोंसावीकीरण कळसईत,बालाजी कळसाईत,संतोष लोंढे,
    सुतार व लोहार समाजातील महिला पुरुषांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन डोरले यांनी केले तर नागनाथ मौरे यांनी आभार मानले.
error: Content is protected !!