धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.20 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 590 कारवाया करुन 3,93,250 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)किरण दिलीप कांबळे, वय 43 वर्षे, रा. साठेनगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.02.2024 रोजी 16.00 वा. सु. मुरुम शहरात साठेनगर येथे आपल्या राहात्या घराच्या समोर मोकळ्या जागेत अंदाजे 2,100 ₹ किमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)बिभीषन गुंडू मस्के, वय 48 वर्षे, रा. भातागळी ता. लोहारा ह.मु. कोराळ ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.02.2024 रोजी 17.50 वा. सु. दाळींब शिवारातील कोराळ मोड येथे आर्यन धाब्याचे बाजूस अंदाजे 2,400 ₹ किमतीची 24 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)महेश गुंडु बिराजदार, वय 25 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.20.02.2024 रोजी 19.20 वा. सु. जेवळी रोडवली हॉटेल शिवानी समोर अंदाजे 960 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 2)अमोल विलास हंकारे, वय 35 वर्षे, रा. कोंडजीगड ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.20.02.2024 रोजी 17.50 वा. सु. भाउसाहेब बिराजदार साखर कारखाना समोर अंदाजे 1,140 ₹ किमतीच च्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
तामलवाडी पोठाच्या पथकास आरोपी नामे-सावंत खेमा राठोड, वय 38 वर्षे, रा. बक्षी हिप्परगा ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर ह.मु. खडकी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.20.02.2024 रोजी 12.00 वा. सु. राजु गुरप्पा राठोड यांचे शेत गट नं 141 मध्ये खडकी शिवारात अंदाजे 80,000 ₹ किमतीचे 1,600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.20.02.2024 रोजी 15.30 ते 19.10 वा. सु. मुरुम पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)विजय बाबुराव कुंभार, वय 34 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. विठ्ठलसाई साखर कारखानाच्या मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 560 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)उमेश राम व्हलदुरे, वय 36 वर्षे, रा. सुपतगाव ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.10 वा. सु. दांळीब गावातील बसस्थानकच्या बाजूस पानटपरी समोर मुंबई मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 860 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.20.02.2024 रोजी 16.35 ते 16.45 वा. सु. कळंब पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)सलीम इब्राहिम बागवान, वय 30वर्षे, रा. गांधीनगर पुनर्वसन सावरगाव ता. कळंब जि. धाराशिव हे 16.35 वा. सु. कळंब ते ढोकी जाणारे रोडचे बाजूस जुने दुध डेअरी जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,040 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)फिरोज फारुख शेख, वय 34 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार लाईन रोडच्या बाजूस ओम मसाला दुकानांचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 770 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.20.02.2024 रोजी 12.10 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत चिखली चौरस्ता येथील भानुदास सुरवसे यांच पत्राचे गाळ्या मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पांडुरंग साधू हातागळे, वय 45 वर्षे, रा. चिखली ता. जि. धाराशिव हे 12.10 वा. सु. चिखली चौरस्ता येथील भानुदास सुरवसे यांच पत्राचे गाळ्या मध्ये मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.20.02.2024 रोजी 12.45 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत आरटीओ चेक पोस्टच्या पुढे हैद्राबाद हायवे रोडवर राजु पाटील यांचे हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)माधव बसवणप्पा लिंगशेट्टी, वय 48 वर्षे, रा. घाटोळ बसवकल्याण, 2) बाबुराव रा. रायचुर ह.मु. तलमोड बॉर्डर ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे 12.45 वा. सु. आरटीओ चेक पोस्टच्या पुढे हैद्राबाद हायवे रोडवर राजु पाटील यांचे हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 11,400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.20.02.2024 रोजी 15.20 वा. सु. येरमाळा पो. ठा. हद्दीत उकडगाव रोडवरील संदीप प्रसाद भंडार समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)मनोज अशोक बारकुल, वय 37 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 15.20 वा. सु. उकडगाव रोडवरील संदीप प्रसाद भंडार समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 810 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.20.02.2024 रोजी 13.15 वा. सु. भुम पो. ठा. हद्दीत बसस्थानकच्या पाठीमागे भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)राम सुखदेव सीतापे, वय 28 वर्षे, रा. गाढवे गल्ली ता. भुम जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. बसस्थानकच्या पाठीमागे भुम येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे
“हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हे दाखल”
ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)आकाश रमेश कसबे, वय 35 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव, 2)बबलू लाला काळे, रा. राजेशनगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्रं. एम.एच.08 व्ही 2155 व एमएच 25 बी 5559 हा दि.20.02.2024 रोजी 11.15 ते 11.30 वा.सु. ढोकी पेट्रोलपंप चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना ढोकी पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द ढोकी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.स. कलम 279 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) समाधान परमेश्वर मराळे, वय 28 वर्षे, रा. गोलेगाव ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.20.01.2024 रोजी 15.16 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एबी 5683 ही धाराशिव ते संभाजी नगर रोडवर एनएच 52 येडशी टोल नाका समोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) सिद्राम बाबुराव पुजारी, वय 42 वर्षे, रा. नागराळ गुंता उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 16.00 ते 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 0483 ही उमरगा चौरस्ता येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) शिंभु दयाल गुर्जर, वय 30 वर्षे, रा. आत्माज भोमा राम गुर्जर ढाणी चेचीयान छापर बासडी सीकर नीम काथाना राजस्थान ह.मु. कळंब ता. कळंब जि. धाराशिव, हे दि.20.01.2024 रोजी 18.44 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र आरजे 23 जीएस 0476 ही होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) विवेक विनायक राठोड, वय 20 वर्षे, रा. कावलदरा ता. जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 01.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 2548 ही आठवडी बाजार रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) विद्यासागर दत्तात्रय सुतार, वय 30 वर्षे, रा. बार्शी रोड भगीरती हाउसिंग सोसायटी धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 20.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही जिल्हा कारागृह समोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)पांडुरंग भानेदास लोमटे, वय 40 वर्षे, रा. तेर ता. जि.धाराशिव, 2) आसेफ फेरोज काझी, वय 26 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव, 3) अशोक हरीभाउ लाकाळ, वय 33 वर्षे, रा. गोर्वधनवाडी ता. जि. धाराशिव, 4) राजेंद्र शंकर शिंदे, वय 52 वर्षे, रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव, 5) बालाजी सुरेश खैरमोडे, वय 48 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे सर्वजन दि.20.02.2024 रोजी 10.30 ते 13.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे छोटा हत्ती क्र एमएच 25 एफ 6680, ॲपे रिक्षा क्र एमएच 43 एसी 9419, ॲपे रिक्षा क्र एमएच 44 ए 3046, छोटा हत्ती क्र एमएच 25 पी 4216, मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 6943 हे ढोकी पेट्रोलपंप चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना ढोकी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी पोलीस ठाणे :1)आरोपी नामे-प्रशांत बंकट कावळे, वय 46 वर्षे, रा. ईट, ता.भुम जि. धाराशिव यांनी दि. 19.02.2024 रोजी 19.00 वा. सु. भुम ते ईट रोडवरील यशराज बिअर बार ॲन्ड परमीट रुममध्ये ईट शिवारात हे मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे जा.क्र संकीर्ण/112024/211/ अधि. दि. 16.02.2024 अन्वये धाराशिव जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी एफ.एल. 4 अनुपत्या ताडी विक्री अनुज्ञपत्या दि. 19.02.2024 या एक दिवशी पुर्णपणे बंद ठेवणे बाबतचे आदेशाचे उल्लंघन करुन स्वत:चे अस्थापना चालू ठेवले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि.स. कलम- 188 अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालाविरुध्दचे गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रिया शिवाजी गायकवाड, वय 35 वर्षे, रा. पुणे या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असता तुळजाभवानी मंदीर परिसर येथे होमाचे दर्शन घेत असताना प्रिया गायकवाड यांचे लेडीज पर्स मधील छोट्या पर्स मध्ये ठेवलेली रोख रक्कम अंदाजे 8,100₹ ही दि 20.02.2024 रोजी 12.50 वा.सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रिया गायकवाड यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) दत्तात्रय शिवाजी गोरे, 2) बाजीराव लक्ष्मण मोरे, 3) पृथ्वीराज आण्णा मोरे, 4) श्रिनिवास सागर मोरे, 5) मुन्ना अंकुश मोरे, 6) सुनिल श्रीमंत नांगरे, 7) बापूराव अंकुश मोरे सर्व रा. सारोळा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 19.02.2024 रोजी 22.00 वा. सु. सारोळा येथील चौकात फिर्यादी नामे- आकाश राजेंद्र उकरंडे, वय 24 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी विना कारण गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फायबरच्या पाईपने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश उकरंडे यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-1)जिवीत हरिदनाथ शेट्टी, वय 44 वर्षे, रा. येरलापट्टी ता. कारलाका जि. उडपी ह.मु. श्रीनाथ मंगल कार्यालय पाठीमागे तुळजापूर हे दि. 19.02.2024 रोजी 23.05 वा. सु. वडगाव लाख शिवार गट नं 53 व 54 जे.एस. डब्ल्यु डोल्वी कंपीनचे पवनचक्कीचे लोकेशन क्र 636 चे काम करत असताना अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तोंडाला लाल व भगवे रुमाला बांधुन कंपनीचे कर्मचाऱ्यारी व फिर्यादी यांना दगड, काठी, रॉडने मारहाण करुन जखमी केले. लोकेशन क्र 636 चे आवारात उभी असलेली टाटा व्हॅन व मोटरसायकल चे काच फोडून अंदाजे 27,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जिवीत शेट्टी यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 427, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)प्रशांत पुरतले, 2) गुराण्णा लक्ष्मण तडकल, 3) संतोष पुरातले सर्व रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव अनोळखी दोन इसम यांनी दि. 20.02.2024 रोजी 20.30 वा. सु. काळे प्लॉट उमरगा येथे फिर्यादी नामे- रितेश परमेश्वर उसके, वय 21 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकल सावकास चालवा असे बोलण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी कत्तीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रितेश उसके यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) सुनिल संतोष आगलदरे, वय 20 वर्षे, 2) भुषण रामकृष्ण सिडाम, वय 18 वर्षे,रा. इटोला ता. दिग्रज जि. यवतमाळ हे दि.19.02.2024 रोजी 10.30 वा. सु. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव येथे खामसवाडी ते मंगरुळ जाणारे रोडचे बाजूस भारत सदाशिव शेळके यांच शेतात उस ट्रेलर मध्ये भरुन उस फड मालक यांचा उभा केलेला ट्रॅक्टर हेडने ट्रेलर बाहेर काढण्यासाठी आणला असता आरोपी नामे सुनिल आगलदरे व भुषण सिडाम हे त्यावर बसलेले असताना सुनिल आगलदारे यांनी ट्रॅक्टर हेड हा हायगई व निष्काळजीपणे चालवून विहरीत घालून भुषण सिडाम, स्वता गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिता रामकृष्ण सिडाम, वय 30 वर्षे, रा. इटोली ता. दिग्रज जि. यवतमाळ ह.मु. खामसवाडी शिवार ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी