गोविंदपूर (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील ग्राम पंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व हनुमान मंदिरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे,अनिल मुंडे,वसंत जाधव,मधुकर मिसाळ,विष्णू मुंडे,अगंद माळी,भगवान घबाडे,अनंत घोगरे, चंदुलाल मुंडे,दादा घोगरे,विठ्ठल मुंडे, भारत मिसाळ,सतिश पाटील,माणिक मुंडे, कबन मुंडे,हनुमंत फुगारे,अमोल माळी,फकीर विधाते,महादेव जाधव,आश्रुबा मुंडे,शाहाजी सुरवसे,पांडुरंग मेनकुदळे,गणेश मुंडे, विश्वनाथ सुरवसे,अंगणवाडी सेविका सुशाला पाटील, सुमन सुरवसे, धम्मा जाधव, कमल गायकवाड व गावातील नागरीक मोठ्या संख्येन उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले