ईटकूर – गायरान वस्ती इटकुर येथे दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. या वेळी बार्टीच्या समतादूत अर्चना अण्णासाहेब रणदिवे म्हणाल्या की, ज्या प्रमाणे जिजाऊ मातेने आपल्या शिवबा वर संस्कार केले त्या प्रमाणेच सर्व माता पालक यांनी आपल्या मुला वर संस्कार करावेत. जिजाऊ मातेने शिवरायांना स्त्रियांचा आदर करायला शिकवले.अठरा पगङ जाती एकत्र करून स्वराज निर्माण करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जातपात मानली जात नव्हती.सर्व जण गुण्यागोविंदाने राहत असत. अशाच संस्काराची गरज देशाला आहे असे प्रतिपादन अर्चना रणदिवे यांनी केली. या वेळी यशोदा अंगणवाडी क्रमांक 407 मधील कार्यकर्त्यां जयश्री ताई शिंदे तसेच मदतनीस कोमल ताई कदम व प्रतिभा शिंदे, दैवशाला काळे, साखर बाई काळे, सुनीता काळे,गौरी काळे,साईनाथ काळे,राजश्री काळे, काशिनाथ काळे आदींची उपस्थित होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले