जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची स्थापना व पूजन
कळंब (माधवसिंग राजपूत) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती कळंब शहरात उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्त भगव्या पताका चौका चौकात स्वागत कमानी ,प्रवेशद्वार विद्युत रोषणाई यांनी शहर उजळून निघाले आहे. आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला व पुष्पहार अर्पण करण्यात आला यासाठी क्रेनची मदत घेतली पुतळ्यास आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई प्रा.श्रीधर भवर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती (शरदचंद्रजी पवार गट), डॉ.ऋषिकेश भवर यांच्या वतीने करण्यात आली आहे.सकाळपासून शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील ,शिवाजी कापसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व एस पी शुगर चेअरमन सुरेश पाटील यांनी अभिवादन केले.नगर परिषदेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.शहरात शिवमय वातावरण होते भगवी ,टोपी ,जॅकेट ,फेटा तसेच अनेक पालकांनी आपल्या मुला, मुलींना छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. शहरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते दुपारी १२.०० वाजता शिव सेवा तालीम संघ शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने देवी मंदिर कळंब येथून भव्य महिला रॅली व व छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली या रॅलीत भगवे फेटे बांधून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते तर दुपारी ४.०० नंतर शहरातील विविध शिवजयंती महोत्सव मंडळाच्या भव्य मिरवणुका निघाल्या यात शिव सेवा तालीम संघ,छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, श्रीमंतयोगी शिवजयंती महोत्सव, मार्केट यार्ड व्यापारी मंडळ ,जाणता राजा जयंती उत्सव मंडळांच्या मिरवणुका भव्य होत्या तर स्वराज ग्रुप इंदिरानगर या शिवजयंती उत्सव मंडळांनी श्री प्रभू रामचंद्र व महाबली हनुमंत भव्य मिरवणुकीचे आकर्षण होते. राष्ट्रवादी युवा काँग्रेस शिवजयंती मंडळाच्या वतीने बाल वारकरी भजनी मंडळ तसेच धनगरी नृत्य सादर केले.मिरवणुकीत बाहेर गावाहून आलेल्या शिवभक्तांसाठी मावळा ग्रुपच्या वतीने दिवसभर अन्नदान करण्यात आले. त्याचबरोबर वेगळ्या ठिकाणी अन्नदान व पाणी वाटप सुरू होते. सकल शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित रक्ताने शिबिरात १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले