कळंब – तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथील सौंदणा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दि 17 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांच्यात लढत झाली .तेरा संचालक असलेल्या या सोसायटीत तेरा जागेपैकी बारा जागा जिंकत शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे यांना स्वतःसह पराभवास सामोरे जावे लागले. या निवडणूकीत 549 पैकी 443 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. * यामध्ये शिवसेनेचे खालील उमेदवार निवडून आले व त्यांना पडलेली मते. 1)सर्वसाधारण मधून – धायगुडे कमलाबाई रघुनाथ (228),काळे गोपीनाथ विठ्ठल (225)पालकर गोपीनाथ श्रीधर (258),पालकर पप्पू ज्ञानोबा, (251),शेळके अंबऋषी भानूदास (254),शेळके संभाजी बुधा (258),शिंदे शहाजी गणपत (270) महीला प्रवर्ग – पालकर शुभांगी परमेश्वर (243),गायकवाड सुमनबाई व्यंकट(233)
एन टी प्रवर्ग – डॉ पंढरीनाथ वैजनाथ देवकते (264) ओबीसी प्रवर्ग – गुडापे गणपती ईरापा (255) अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रकाश पाचपिंडे बिनविरोध निवडून आले आहेत.
*पराभूत उमेदवार सर्वसाधारण – गायकवाड शिवाजी प्रेमदास (159),लकडे बालासाहेब ज्ञानोबा (155),लकडे शिवाजी ज्ञानोबा (153),महानवर लक्ष्मण एकनाथ (158),मारकड फुलचंद दादाराव (160),पालकर विनायक श्रीधर (162),शेळके मुरलीधर तुकाराम (147)
* महीला प्रवर्ग – लकडे हिराबाई रामभाऊ (179),पालकर शशिकला धोंडीराम (177) एन टी प्रवर्ग – गिरी चंद्रकांत लाला (169) ओबीसी – डिगे महादेव त्रिंबक (175) यामध्ये सर्वसाधारण मधून असलेले साहेबराव वामनराव गायकवाड यांनी (176)मते घेत विजय खेचून आणला आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून पंचायत समिती गणप्रमुख भारत पालकर, वाकडीचे उपसरपंच बाबा शिंदे, परमेश्वर पालकर, युवासेनेचे उपतालुकाप्रमुख संदीप पालकर, दगडू पालकर, लासराचे सरपंच नवनाथ शेळके, कचरु शेळके, बब्रुवान गायकवाड, सर्जेराव देवकते, रणजित देशमुख यांनी प्रयत्न केले तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवाजी लकडे, लक्ष्मण शेळके आदिनी प्रयत्न केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले