धाराशिव – येथील जे.एफ.अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय, धाराशिव येथे दिनांक १५/०२/२०२४ रोजी,रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ. रोहीणी काचोळे ह्या होत्या.यावेळी त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर प्रमुख उपस्थिती डॉ. शिल्पा दमकोंडवार अधिष्टाथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव व संजय काचोळे हे होते. Vocational Excellence Awards या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट , उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण दहा जणांचा गौरव करण्यात आला, यात मोनिका जयसिंग कवडे-(पोस्ट वुमन), शुभांगी विजय सरवदे (लाईन वुमेन), रेबेका आनंद भंडारे-(प्रभारी मॅट्रोन), लक्ष्मण भीमराव सिडाम-(मसाजिस्ट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव), अश्विनी अमोल जाधव-(वाहक एस टी महामंडळ), सूर्यकांत बापूराव घोडके-(चालक एस टी महामंडळ), सीमा रामराजे थोरात-(आशा कार्यकर्ती), भास्कर निवृत्ती पवार-(मुकादम सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव), सोनाली शिवाजी लांडगे-(शिक्षिका वडार वस्ती पालावरची शाळा, धाराशिव), निर्मला वासुदेव कुलकर्णी-(अंगणवाडी कार्यकर्ती) यांचा समावेश आहे. सदरील कार्यक्रमात सत्कारार्थी व त्यांचे कुटुंबीय, रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक रोटरी क्लब अध्यक्षा डॉ. अनार साळुंके ह्यानी केले तर सूत्रसंचलन व आभार सचिव डॉ.मीना जिंतूरकर ह्यानी मानले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी