कळंब (धाराशिव) – भारत स्काऊट्स आणि गाईड्स या राष्ट्रीय संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स आणि धाराशिव भारत स्काऊट्स आणि गाईड्स यांच्यां संयुक्त विद्यमानाने नुकताच डिसेंबर २०२३ मध्ये लातूर येथील राज्य प्रशिक्षण केंद्र लातूर येथे स्काऊट्स आणि गाईड्स राज्य पुरस्कार परीक्षा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या परीक्षा शिबिर मध्ये धाराशिव , लातूर व नांदेड हे जिल्हे सहभागी झाले “त्यात धाराशिव जिल्ह्यातील १५० स्काऊट्स आणि ९९ गाईड्स यांनी सहभाग घेतला होता. या राज्य पुरस्कार परीक्षेत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथील १४ गाईडस त्यामध्ये कु.तनुजा किरण कोळी,संपदा अमोल नलावडे,स्नेहल संदिपान थोरात,राजनंदिनी रामेश्वर तांबारे,मोहिनी तानाजी लाड,आर्या अमर कवडे,राजनंदिनी बालाजी तामाने,साधना अंगद शिंदे,पुनम बाळू गुंठाळ,समिक्षा बालाजी बोराडे,पोर्णिमा अश्रुबा किलमिसे,प्रांजळ दिनेश पालखे,स्नेहल रामेश्वर साळवे,विशाखा मोहन कवडे व ४स्काऊटस चि.आर्यन धनेश्वर गायकवाड,शुभम सोमेराव राक्षे,श्रीराम दिनेश जाधव,पियुष मोहन भवर ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे . उत्तीर्ण झालेले सर्व स्काऊट्स आणि गाईड्स हे स्काऊट् मास्टर जिवनसिंह ठाकूरसर व गाईड कॅप्टन श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत असून आता पुढे हे चारही स्काऊट्स आणि १४ गाईड्स राष्ट्रीय स्तरीय राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेची तयारी करणार आहेत.. भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयचे स्काऊट संघटक विक्रांत देशपांडे व शाळेचे मुख्याध्यापक जाफर पठाणउपप्राचार्या डॉ.मिनाक्षी शिंदे ,पर्यवेक्षक मुंढे,तसेच स्काऊट गाईड विभाग प्रमुख श्रीमती म्हस्के,सावंतसर, समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा शिंदे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व स्काऊट्स आणि गाईड्स यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट