August 9, 2025

शिवपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

  • धाराशिव (जयनारायण दरक ) –
    कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१५ फेब्रुवारी २०१४ रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी गावचे सरपंच अमोल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, बाल आनंद नगरी ( बाजार) मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नरसिंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती संयमा बेग, प्रणिता चांदणे, रोहिणी शेळके, अनुसया लोंढे, विकास बंडगर, अनिल पाटोळे, संतोष पाटोळे यांनी परिश्रम घेतले.
    तसेच या कार्यक्रमासाठी निन्हाळ प्रशांत केंद्रप्रमुख केंद्र मोहा, दयानंद पाटील, नितीन बंडगर ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पाटुळे या वेळी उपस्थित होते.
    सरपंच अमोल पाटील यांनी सर्व उपस्थित स्टॉलधारक विद्यार्थी यांना त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देऊन 1001 रुपये बक्षीस दिले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश मिसाळ यांनीही 1001 रुपये बक्षीस दिले. ग्रामपंचायत सदस्य दयानंद पाटील नितीन बंडगर यांनीही प्रत्येकी 501 रुपये बक्षीस दिले.
    आनंद नगरीमध्ये आज विविध असे स्टॉल लावण्यात आलेले होते. सर्व स्टॉलधारक विद्यार्थ्यांनी आज सर्व स्टॉलचा आनंद घेतला. खरेदी विक्री व्यवहार केले. दिवसभराच्या सर्व व्यवहारातून आज ९७२५ रुपये कमाई झाली. शेवटी सर्व उपस्थित ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थ्यांचे आभार शिक्षिका श्रीमती वंदना मडके यांनी मानले या वेळी पालकांनी गर्दी केली होती.
error: Content is protected !!