मुंबई (तात्यासाहेब सोनवणे ) – आशा स्वयंसेविका व गटपर्वतक महासंघाच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई ढाकणे यांनी मुंबई येथून बोलताना आशा स्वयंसेविकांच्या आशा जिवंत ठेवू या.. बळकट करु या..! सरकारला जाब विचारु या.. शक्य झाले तर या आशा स्वयंसेविकांना प्रत्यक्ष मदत करु या…..असे आवाहन केले. १२ जानेवारी २०१४ पासून आशा स्वयंसेविकांनी कामावर बहिष्कार टाकलेला आहे.. त्यानंतर कॅबिनेटची मीटिंग १ फेब्रुवारीला असल्याने त्यांनी ३० तारखेला आझाद मैदानामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होत. त्यानंतर आशा कार्यकर्त्यांनी ९ फेब्रुवारी ला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री GR काढतील अशी आशा स्वयंसेविकांना अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने ९ तारखेपासून ठाण्यामध्ये सगळ्या ( जवळजवळ २० ते २५ हजार) आशा स्वयंसेविका मैदानात बसून होत्या.पण ठाण्याच्या मैदानामध्ये वॉशरूमची सुविधा नव्हती आणि जेवणासाठी हॉटेल वगैरे नसल्याने त्यांचे अतिशय हाल व्हायला लागले, म्हणून शनिवारी १० तारखेला आजाद मैदान, मुंबई येथे आल्या. काही आशा वर्कर तीन दिवस पायी चालत आल्या, ज्यापैकी २७ जणी आजही हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. ठाणे, रायगड व पुणे परिसरातील काही आशा स्वयंसेविकांची घरे जवळ असल्याने घरी येऊन खिचडी,चिवडा वगैरे खाण्याचं साहित्य बनवून घेऊन येतं आहेत व आपल्या सहकारी भगिनींना देत आहेत. ५ दिवस झाले तरी या सरकारला जाग येत नाही. मागच्या ५ दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून दूर व पोटाला चिमटा घेत आशा स्वयंसेविका ठाणे ते आझाद मैदान प्रवास करत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत पण सरकारी यंत्रणा कशात मश्गूल आहे ते काही कळत नाही. सरकारचे पाच महिने झाले, आश्वासन देऊन सरकार म्हणाले होते. ‘ आम्ही तुमचं मानधन वाढवतो ‘, सरकारने टीव्हीला जाहिरात दिली, चॅनलवाल्यांनी दाखवलं, पेपर मध्ये छापून झाले आशा स्वयंसेविकांना लेखी आश्वासनांची प्रत सुद्धा दिली. पण आता जीआर काढायचे तर आता मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ आम्हाला बजेट बघावं लागेल, दहा दिवसांनी सांगतो.’ सर्व आशा स्वयंसेविका घरच्या जबाबदारीतून वेळ काढून येत आहेत. काहींचे छोटी बाळ आहेत, काहींच्या घरी कोणीच नाही, तरी पण सगळ्या येथे थांबल्या आहेत.. उघड्या मैदानातच एका चादरीवर झोपतात.. बऱ्याच जणींकडील पैसे संपले आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्या एकमेकींना चहा वगैरे पाजत आहेत. एवढे सगळे भोगत त्या मुक्कामी रहात आहेत.. आज त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. पण सरकार आणि प्रसारमाध्यमे सत्तेच्या खेळात रममाण आहेत.. त्यांना याची दखल घ्यावीशी वाटत नाही. किमान आपण त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करून अथवा समाजमाध्यमातून आवाज उठवून सरकारवर दबाव आणून आपल्या सह लाखो गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आशांना बळ आणि न्याय मिळवून देऊया असे प्रतिपादन सचिव सौ.आशाताई ढाकणे यांनी प्रतिपादन केले.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती