August 9, 2025

धाराशिव जिल्ह्यात मराठा तरुण कार्यकर्ते आक्रमक

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे – पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान,सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नसल्याने व मनोज पाटील यांची प्रकृती तासातासाने चिंताजनक होत चालली आहे.
    या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा बंदचीही हाक देण्यात आली असून धाराशिव शहरासह तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम परंडा,वाशी या तालुक्यांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सरकारकडून तातडीने निर्णय घ्यावा आणि लोकप्रतिनिधींनी सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे, यासाठी मराठा तरुण कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धाराशिव शहरातील शेकडो कार्यकर्ते काही वेळापूर्वी आमदारांच्या घराकडे रवाना झाले आहेत.
    वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांच्या दारात जाऊन घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने सोडवायला भाग पाडावे, यासाठी भूमिका मांडली जात आहे काही वेळापूर्वीच भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या शिंगोली येथील घरासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. त्यानंतर शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याही घराकडे कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगण्यात आले.
    मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
error: Content is protected !!