कळंब ( माधवसिंग राजपूत ) – उमेश जगन्नाथ आप्पा मिटकरी हे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचे भक्त असून शिवनाम सप्ताह व अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये कीर्तन व प्रवचन सेवा करीत आहेत. कळंबचेचे रहिवासी व भूम तालुक्यातील चुंबळी या गावी स्थायिक झाली आहेत.यांचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले असून विद्यार्थी असताना एस. एफ.आय या डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनेत त्यांनी काम केले तसेच शिक्षक म्हणून नोकरी ही केली. यानंतर त्यांच्या वाचनात संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचे ग्रंथ वाचण्यात आल्याने त्यांचे मन व मत परिवर्तन झाले संत महात्म्यांनी मानवाच्या कल्याणासाठी जी विचार सांगितले या विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने उमेश मिटकरी यांनी किर्तन व प्रवचन सेवा सुरू केली. कळंब हे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचे मूळ गाव आहे.कळंब येथे त्यांचा मठ आहे.प्रतिवर्षी कळंब येथे मन्मथ स्वामी भक्तांच्या वतीने अखंड शिवनाम
सप्ताहचे आयोजन केले जाते. उमेश मिटकरी यांचे कळंब येथील मनमत स्वामी मठ येथे दिनांक दिनांक 13 फेब्रुवारी रोजी अखंड शिवनाम सप्ताहात कीर्तन आहे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी ग्रंथरचना केली आहे यातून त्यांनी अमूल्य विचार अमृत दिले आहे हे विचार तसेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी गाथेमधून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा तसेच अंधश्रद्धा नष्ट व्हावी अमूल्य असे विचार दिले आहेत विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच यासाठी वडील कै.जगन्नाथ आप्पा मिटकरी बापू यांनी आपणास प्रोत्साहन दिले यामुळे ही सेवा करीत आहे व किर्तन व प्रवचन समाजप्रबोधनासाठी सर्वात उत्कृष्ट मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात