धाराशिव (जिमाका) – धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या नावाने सोशल मीडीयावर बनावट फेसबुक खाते तयार करून त्यातील मेसेंजरद्वारे जिल्हाधिकारी यांना ओळखणा-या लोकांशी संवाद करुन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे बोलत असल्याचे भासवून ओळखीच्या लोकांना जिल्हाधिकारी यांचे मिलीटरीमधील मित्राचे फर्निचर सामान स्वस्तात विकणे आहे व ते तुम्ही घ्यावे असे सांगून संपर्कासाठी विविध मोबाईल क्रमांक त्यांना देऊन त्या नंबरवरून संपर्क करून सामानाचे फोटो पाठवून सामान घेण्यासाठी,सामान ट्रान्सपोर्ट करण्यासाठी विविध कारणे सांगून कोणीतरी अज्ञात व्यक्ती जिल्हाधिकारी यांचे नावे लोकांची फसवणूक करत आहेत.तसेच जिल्हाधिकारी यांचा फोटो व्हॉट्स अँपवर डीपी ठेऊन लोकांशी संवाद करुन याच पध्दतीने लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहे.अशा घटना झाल्याबाबत जिल्हाधिकारी, धाराशिव यांना जिल्हयात व जिल्हयाबाहेर त्यांना ओळखणा-या व्यक्तींनी त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत कळविले आहे.सायबर गुन्हे पोलीस स्टेशन,धाराशिव येथे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या नावाने काढलेल्या फेक फेसबुक व बनावट व्हाट्स अँप खाते बंद करणेबाबतची तक्रार 28 सप्टेंबर रोजी नोंदविली आहे. त्यासंबंधी अनुषंगीक कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की,डॉ.सचिन ओबासे / Dr. Sachin Ombase / सचिन ओम्बासे / Sachin Ombase असे नाव वापरून सोशल मीडियावर आलेली कोणतीही बनावट खात्यावरुन आलेली Friend Request स्वीकारू नये किंवा डॉ. ओम्बासे फोटो वापरून बनावट Whats App नंबरवर कोणतीही प्रतिक्रीया देणे टाळावे व त्यावर विश्वास ठेऊ नये,याची सर्व जनतेने नोंद घ्यावी,सायबर गुन्हयाविषयी सुरक्षितता बाळगून योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व जनतेस केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात