August 9, 2025

मावळा ग्रुप ला शिवभूषण पुरस्कार जाहीर

  • कळंब – येथील शिवजयंती निमित्त अन्नदान करणाऱ्या मावळा ग्रुप ला कळंब तालुका पत्रकार संघाचा शिवभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
    कळंब तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली.
    कळंब येथील शिवजयंती निमित्त गेल्या नऊ वर्षांपासून अन्नदान करणाऱ्या मावळा ग्रुपला शिवभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. गत वर्षी सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस यांना देण्यात आला होता.लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
error: Content is protected !!