August 9, 2025

उपळा येथे घरोघरी संवाद; विकास पुस्तिकेचे वाटप

  • धाराशिव – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या गाव चलो अभियान अंतर्गत धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.)येथे शनिवारी (दि.१०) घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विकास पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
    या अभियानामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण शेटे, विधिज्ञ ॲड.युवराज खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन विकास पुस्तिका भेट देऊन संवाद साधण्यात आला. यावेळी भाजपाचे युवा नेते दशरथ (चिंटूभैय्या) पाटील, धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमरसिंह पडवळ, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, अरूण माने, दत्तात्रय कळमकर, शशिकांत पडवळ, रणजित बागल, प्रशांत पडवळ, नितीन घोगरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!