August 9, 2025

शासकीय कार्यालय व महापुरुषांच्या पुतळ्या शेजारी डिजीटल बॅनर लावण्यात येऊ नयेत – गणेश वाघमारे

  • धाराशिव :- शहराला बॅनर डिजीटलने विळखा घातला असुन शहरातील मेन चौकातील व्यापारी संकुल झाकले जातात,या डिजीटल बॅनर मुळे प्रदुर्षण मोठ्या प्रमाणावर होऊन महापुरुषांच्या पुतळ्या शेजारील भले मोठे बॅनर लावले जातात,मध्यंतरी बॅनर डिजीटल वरती बार कोडची सक्ती केली होती व महापुरुषांच्या पुतळ्या पासुन ठराविक अंतरावर लावण्यास नियम अटीची तरतुद करण्यात आली होती परंतु याउलट जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयासमोर डिजीटल बॅनर मोठ्या प्रमाणात लाऊन नियमांचे उल्लंघन केले जात आहे,यापासुन शासनाला मिळणारा कर देखील बुडत आहे.जिल्हा परिषद समोर छोटे छोटे स्टाॅल टाकुन उपजिविका भागविणाऱ्यांना अतिक्रमण म्हणुन कारवाई केली जाते परंतु या बॅनर डिजीटल वरती प्रशासन गप्प का.‌.?जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व इतर शासकीय कार्यालय परिसरात बॅनर डिजीटल लावण्यात येऊ नये जरी लावले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केली आहे.
error: Content is protected !!