August 9, 2025

मी रमाई बोलतेय ह्या एकपात्री नाट्यप्रयोगाने हावरगावककर झाले भावूक

  • कळंब – मौजे हावरगाव ता.कळंब जिल्हा धाराशिव येथे माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त मी रमाई बोलतेय हा डाॅ.वैभवी घारगावकर हीचा 169 वा एकपात्री नाट्य प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    या कार्यक्रमाचे उद्घाटन आर के भाऊ कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
    यावेळी हावरगाव येथील ग्रा.प. सदस्या सौ.कंपनबाई किसनराव कोल्हे यांच्या हस्ते रमाईकार डॉ. वैभवी घारगावकर हिचा तसेच भीमनगर मधील सर्व माता भगिनी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 169 वा एकपात्री नाट्य प्रयोग करून माता रमाई यांच्या जीवनावर आधारित संपूर्ण इतिहास हुबेहुब मांडण्याचा प्रयत्न केला सर्व महिला साश्रूनयनांनी भावूक होवून हा एकपात्री नाट्य प्रयोग ऐकत होत्या.
    या कार्यक्रमासाठी आलेले विलास घारगावकर व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला तसेच आकाश हजारे यांची तलाठी भरती मध्ये धाराशीव जिल्ह्य़ात 192 मार्क मिळवून यश मिळविले. त्यामुळे त्याचा व आई वडील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी आर.के.भाऊ कोल्हे,अनिल हजारे ग्रा प सदस्य हावरगाव,जिल्हा नेते वंचित बहूजन आघाडी सुधाकर कोल्हे, कंपनबाई कोल्हे, वावरे गणेश, विष्णू कोल्हे, आप्पासाहेब हजारे, सायस हजारे,वैभव हजारे, लगाडे नीतीन, वाल्मिक हजारे, बाबासाहेब हजारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. सी .हजारे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व भीम नगर मधील व बाहेर गावातील श्रोते जमले होते.
error: Content is protected !!