कळंब (जयनारायण दरक ) – कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2022 उर्वरित पिक विमा दिनांक 29 जानेवारी पर्यंत वाटप करण्याचे निर्देश असताना केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत खरीप 2022 हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पूर्णपणे वाहून गेले होते व काही दिवस सोयाबीन पीक पाण्यात राहिल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा देणे बंधनकारक असताना भारतीय विमा कंपनीने निम्मी रक्कम वाटप करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उर्वरित पिक विमा दिनांक 29 जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश दिले होते परंतु कंपनीने कळंब तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात आला असून तर या पिक विमा पासून तालुक्यातील अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहेत अद्याप काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नसून यासंदर्भात जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी प्रतिनिधी कृष्णवर्धन पाटील यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी मनसुखे यांच्याशी संपर्क साधा असे सांगून त्यांच्या मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केला असता सतत फोन बंद सांगत असून व काही कालावधी पुरता चालू करत आहेत त्या कालावधीत त्यांना फोन केला तर ते फोन घेत नसून त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे तरी भारतीय विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2022 चा पिक विमा दिनांक 29 जानेवारी पर्यंत वाटप करण्याचे निर्देश असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गांमधून संताप व्यक्त होत आहे तरी विमा कंपनीच्या प्रतिनिधीने तात्काळ उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करण्यात यावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. तसेच भारतीय विमा कंपनीचे प्रतिनिधी मनसुखे यांच्याशी आमचे सा.पावन ज्योतचे कळंब प्रतिनिधी जयनारायण दरक चार दिवसापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचा आणी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही तरी वरिष्ठ पातळीवरून तात्काळ अशा कर्मचाऱ्यांना समज देऊन शेतकऱ्यांना सन 2022 चा पिक विमा तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात