August 9, 2025

जंतनाशक मोहिमेत सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी

  • धाराशिव (जिमाका) – आदिवासी विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम ही मोहिम राज्यभर 13 फेब्रुवारी 2024 व मॉपअप दिन 20 फेब्रुवारी 2024 या दिवशी होणार आहे.यावेळी 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांमुलींना अल्बेंन्डॅझॉलची गोळी खाऊ घातली जाणार आहे.
    या मोहिमेची जिल्हा समन्वय समिती सभा 24 जानेवारी रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार राज्यातील 0 ते 19 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण व एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभागजानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीमध्ये या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षांपर्यंतच्या जिल्ह्यातील एकूण 4 लक्ष 26 हजार 575 अपेक्षित लाभार्थी मागील मोहिमेनुसार यामध्ये ग्रामीण भागातील 3 लक्ष 13 हजार 414 तर शहरी भागातील एकूण 1 लक्ष 13 हजार 161 बालक / किशोरवयीन मुला-मुलींची शाळा, महाविद्यालये,अंगणवाड्या,
    आश्रमशाळा आदी ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे.समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ती तसेच अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यामार्फत ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी जंतनाशक गोळीची मात्रा मिळाली नसल्यास त्यांना मॉपअप दिवशी ही मात्रा देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येईल.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा,बालगृहे, बालसुधार गृहे,अनाथ आश्रम,समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहामधील विद्यार्थ्यांसह वीटभट्टी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना जंतनाशक गोळीची मात्रा देण्यात येणार आहे. असे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुददीप मिटकरी यांनी सांगितले.
    तसेच या बैठकीत जंतनाशक मोहिम दिनी निर्जंतुक पाणी, जलसंजीवनीची तात्काळ उपलब्धता करण्यास सांगितले.तसेच आपत्कालीन मदत सेवेच्या क्रमांकाची यादी प्रवेशद्वारावर वा भिंतीवर चिकटवावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी सांगितले.जंतनाशक गोळी घशात अडकू नये यासाठी आरोग्य कर्मचारी समोर शाळेत,अंगणवाडीमध्ये ही गोळी बालकाला चावून खाण्यास तसेच 1 ते 2 वर्षामधील बालकांना गोळीची पावडर करुन देण्याबाबत डॉ. हरिदास यांनी सांगितले.
    याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माइल मुल्ला,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मारुती कोरे व सर्व वैद्यकीय अधीक्षक,सर्व तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!