कळंब – मराठवाड्यातील बहुजनांच्या मुलांना अत्याधुनिक शिक्षण मिळावे म्हणून ग्रामीण भागांत शाळा,विद्यालय व महाविद्यालय स्थापन करणारे व संत नामदेव महाराजांच्या “ज्ञान दिप लावू जगी ” या उक्तीप्रमाणे शिक्षणाचा प्रसार करणारे शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची धर्मपत्नी व ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मातोश्री कै.सुमनबाई ज्ञानदेव मोहेकर (वय – ९२) यांचे दिनांक २५/०१/२०२४ रोजी वार गुरुवार सायंकाळी ०९:३० वाजता वृद्धापकाळानी कळंब येथील निवासस्थानी निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
यांचा अत्यंविधी शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता कळंब येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
सा.साक्षी पावनज्योत व घोडके परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी