गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
गोविंदपूर येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संपूर्ण गावांमधून श्रीराम यांच्या प्रतिमेचे ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील लहान मुलांच्या लेझीम पथक यांनी दिंडीचे लक्ष वेधून घेतली तसेच गावातील भजनी मंडळ व महिलांचा या दिडीं मध्ये मोठा सहभाग होता. श्री राम जय राम जय जय राम च्या जय घोषाणे संपूर्ण नगरी दुमदुमुन निघाली.पूर्ण गावात भगव्या पताकांनी सजवले होते.
यावेळी सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे, वैभव मुंडे,बालाजी सुरवसे, श्रीकांत बिडवे, अक्षय सुरवसे, कबन मुंडे, रघुनाथ मुंडे, भगवान घबाडे, पवन पुरी,गुलाब मुंडे, अनिल मुंडे, भास्कर मुंडे ,चंदुलाल मुंडे, माणिक मुंडे, श्रीहरी मुंडे, सिताराम मुंडे, प्रशांत गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले