कळंब (अरविंद शिंदे) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन विक्रम मोरे ( बारावी कला) याने राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेमध्ये लातूर विभागाकडून खेळताना चतुर्थ क्रमांक मिळवला तसेच राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेमध्ये त्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या महाराष्ट्राच्या संघामध्ये त्याला कांस्य पदक मिळाले. आर्यन मोरे याने शिवछत्रपती स्क्वॅश अकॅडमी येथे सराव केला.
ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती सरस्वती वायभासे, प्रा.हेमंत चांदोरे,प्रा. दीपक वाळके,प्रा.विलास वमन, प्रा.बालाजी राऊत,प्रा.जाकेर काझी,प्रा.गोविंद फेरे,प्रा.संदीप देवकते,प्रा.महेश मडके, राजाभाऊ शिंदे,अनिल शिंदे,परमेश्वर मोरे,निलेश माळी, मोहिते तात्या यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट