कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ही थीम घेऊन सात दिवशीय शिबिर संपन्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या वतीने मौजे डिकसळ येथे सकाळी ११ वाजता जनजागृती रॅलीचे आयोजित करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये मुलगी शिकवा देश वाचवा,पाणी आडवा पाणी जिरवा,झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा अशा सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या उपदेश पर घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. या रॅलीला प्राचार्य.डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य.प्रो.हेमंत भगवान, उपप्राचार्य,प्रो.सतीश लोमटे,लेफ्टनंट.डॉ.हरी पावडे, प्रा.अर्चना मुखेडकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ. संदीप महाजन,डॉ. नामानंद साठे व हनुमंत जाधव अधीक्षक तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष डीकसळ,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे, अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर, व रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन