धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा,ग्रंथालयांकडून नागरिकांना अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात.वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ” तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंर्थामत्र) पुरस्कार ” देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ” “ब” “क” “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १,००,०००/- रुपये, ७५,०००/-रुपये ५०,०००/-, रुपये , २५,०००/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रुपये २५,०००/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. सन २०२२-२३ च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये,कार्यकर्ते व सेवक यांनी आपलं विहित नमुन्यातील अर्ज २२ जानेवारी २०२४ ते ०९ फेब्रुवारी -२०२४ पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत,असे आवाहन राज्य ग्रंथालय संचालनालयाचे प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात