August 9, 2025

राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचा साप्ताहिक विंगच्या वतीने साप्ताहिक देवून सत्कार

कळंब – पत्रकारिता व पत्रकारांसाठी अहोरात्र लढत असलेली देशभरातील मोठी पत्रकारांची संख्या असलेली संघटना व्हॉईस ऑफ मिडीयाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,आरोग्य सेवा प्रमुख भीमेश मुतुला,कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर,प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ व धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे हे दि.१६ जाने २०२३ रोजी शैक्षणिक विभागाचे प्रमुख चेतन कात्रे यांची ज्येष्ठ सुकन्या कुमारी शिवनेरी हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आले असता त्यांचा व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र बारगुले,तालुका उपाध्यक्ष महेश फाटक व तालुका प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर खडबडे यांच्या हस्ते प्रबूध्द रंगभूमी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके लिखित सत्यघटनेवर आधारित ” साक्षी” ही कादंबरी व सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे कोर प्रमुख अमर चोंदे,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,साप्ताहिक विंग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगराज पांचाळ,तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप,तालुका सरचिटणीस अविनाश सावंत,कोषाध्यक्ष सतिश तवले,डिजिटल विंग तालुका कार्याध्यक्ष सलमान मुल्ला,उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी,तालुका प्रसिद्धी प्रमुख दिपक माळी सह व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!