August 9, 2025

स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वामी विवेकानंद राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक जाफर पठाण यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.मीनाक्षी शिंदे भवर उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयातील सहशिक्षक प्रकाश पाळवदे व अर्जुन दीवाने यांचा विद्यालयाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यालयातील समृद्धी लोखंडे, ज्ञानेश्वरी घुले, नम्रता गंगातिरे, सृष्टी सुद्रिक, आर्या गायकवाड, शिवकन्या देशमुख, श्रुती कुचेकर, आरती लांडगे, सिद्धी बोरुळे, अपूर्वा इटकर,अक्षरा खैरमोडे यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विषयी आपले विचार मांडले. तसेच विद्यालयातील नम्रता गंगातिरे, आरती थोरात, गौरी परदेशी या विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे तानाजी गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा गांगर्डे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे ज्ञानेश्वर तोडकर, जीवनसिंह ठाकुर यांनी परिश्रम केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!