August 9, 2025

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरी

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ उपपरिसरात,राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डॉ.प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनीषा असोरे, कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, श्री. सचिन बस्सय्ये, डॉ. महेश्वर कळलावे, डॉ. जितेंद्र शिंदे, डॉ. मेघश्याम पाटिल, डॉ. गणेश शिंदे, अभियंता प्रवीण आळंगे, वरिष्ठ सहाय्यक संजय जाधव, वीजतंत्री हेमंत कांबळे तसेच सर्व विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!