कळंब – आमदार अपात्रता प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बाजूने निर्णय झाला व शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांचीच खरी असल्याचे आज विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी घोषित केले. याचा दि.१० जानेवारी २०२३ रोजी कळंब शहर शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त केला. यावेळी मिठाई वाटून जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, शहरप्रमुख गजानन चोंदे, सुधीर भवर, सागर मुंडे,अँड. मंदार मुळीक, शंकर वाघमारे, कृष्णा हुरगट, प्रमोद करवलकर महेश पुरी, शकील काझी, इम्रान सय्यद, भास्कर पारेकर, जाफर बागवान, मोहसीन शेख,सिध्दू शिंगणापूरे शक्ती नलावडे उत्रेश्वर बप्पा चोंदे, महेश कोळपे, दत्ता शेंडगे, बंडू तावरे, रोहीत शेळके, प्रशांत शेळके, बाजीराव वाघमारे, संघर्ष कांबळे, विठ्ठल जाधव रणजित पवार महेश मोरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी