मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा ‘खरी कमाई ‘या उपक्रमांतर्गत ”बाल आनंद मेळावा “या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा) पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शि.म.ज्ञानदेव मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन हनुमंत ( तात्या ) मडके,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश ( भाऊ ) मोहेकर , ज्ञान प्रसार मा.व उच्च मा.विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप ,ज्ञान प्रसार विद्यालय मोहा पर्यवेक्षक संभाजी गिड्डे,बापू जोशी यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे ,गणितीय क्रिया अवगत व्हाव्यात .नफा तोटा समजून व्यवसायाचे ज्ञान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी पाणीपुरीचे स्टॉल वडापाव स्टॉल ,भेळ स्टॉल ,चहा स्टॉल ,गुलाब जामुन स्टॉल ,इडली सांबर स्टॉल , पावभाजी स्टॉल ,अशा अनेक खाद्यपदार्थांची मेजवानी विद्यार्थ्यांना यावेळी मिळाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती.पांचाळ उषा यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती . सोनवने निता,सोलंकर शहाजी,मडके धनंजय,गुरव शैलेश,मडके संजय,नवनाथ करंजकर, साबळे सुनील,प्रा. रोहित मोहेकर ,प्रा.कोकाटे एच . के,काळे बी.एन,अमरसिंह पाटील ,जाधव मामा,साडेकर प्रथमेश आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील नागरिक , पालक वर्ग ,विद्यार्थी , विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड