कळंब – आधिस्वीकृती धारक संपादक सुभाष दशरथ घोडके यांच्या एकसष्टी निमित्त कळंब तालुक्यातील मौजे पिंपळगाव (डोळा ) येथे दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता गावातील शंभर ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सोहळा माजी सरपंच सुखदेव (नाना) टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबुद्ध भूमी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सचिन ओंम्बासे जिल्हाधिकारी धाराशिव,अतुल कुलकर्णी जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव ,ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे,ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर,मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके,महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर, सचिव भूमिपुत्र वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सुभाष घोडके लिखित साक्षी कादंबरी, विरंगुळा पथनाट्य, अग्रलेख संग्रह आणि पिंपळगाव (डोळा) बहुजन अमृत महोत्सवी सोहळा विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न होत आहे. याचबरोबर मान्यवराच्या हस्ते शाल ,श्रीफळ, हार व फेटा बांधून शंभर ज्येष्ठ अमृत महोत्सवींचा सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवशाहीर बंडु खराटे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समिती अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी केले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड