धाराशिव – प्रकाश बनसोड यांच्या आई स्मृतीशेष देवकाबाई बापुरावजी बनसोड यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळा दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी न्यू रोशन सेलिब्रेशन हॉल, आर्वी, जिल्हा वर्धा येथे घेण्यात आला. या पुरस्काराचे संयोजक प्रकाश बनसोड हे फक्त कवितासंग्रहासाठी पुरस्कार देतात. देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन पुरस्कार दिले जातात. त्यातील पंडित कांबळे यांच्या “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात” या कवितासंग्रहाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. माजी आमदार अमर भाऊ काळे, गझलकार संजय इंगळे, प्रा. मनोहर नाईक, विद्यानंद हाडके, प्रफुल भुजाडे, संयोजक प्रकाश बनसोड यांच्या हस्ते पंडित कांबळे व लीना कांबळे यांचा सपत्निक शाल ,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व बुके देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बाळाभाऊ जगताप, प्रा.पंकज वाघमारे, प्रा. प्रशांत धनवीज, प्रशांत ढोले, प्रीती वाडीभस्मे हे उपस्थित होते. पंडित कांबळे हे नगर परिषद शाळा क्रमांक १४ धाराशिव येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे संदर्भ,चरथ भिक्खवे,आणि पेटलेल्या शहराच्या कल्लोळात हे तीन कविता संग्रह, तसेच उजेडाचा वारस: यु.डी.गायकवाड गौरव ग्रंथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्यिक , साहित्यिक प्रवृत्ती: मूल्ये आणि जाणीवा,दत्तांकुर यांची निवडक कविता, हे चार संपादित पुस्तके. नाचा रे नाचा,गाणी माझ्या गावची, विहार गाणी हे तीन बालकवितासंग्रह,डॉ. बाबुराव गायकवाड यांचे साहित्य आशय आणि विश्लेषण हे समीक्षेचे पुस्तक प्रकाशित आहे. असे एकूण आकरा पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत.पंडित कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेक साहित्यिक, मित्र , नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन