धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 181 कारवाया करुन 1,48,900 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)दसताया उमेश गुत्तेदार, वय 32 वर्षे, रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव हे दि.22.12.2023 रोजी 11.30 वा. सु. बोरखेडा रोडलगत पत्रयाचे शेडचे बाजूला अंदाजे 900 ₹ किंमतीचे 18 कॅरीबॅग सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी नामे -1)अशोक राजेंद्र काळे, वय 49वर्षे, रा. जुना बसडेपो पारधी पिढी धाराशिव ता. जि. धाराशिव, हे दि.22.12.2023 रोजी 15.30 वा. सु. जुना बसडेपो पारधी पिढी धाराशिव ता. जि. धाराशिव, येथे अंदाजे 85,000 ₹ किंमतीची 1,000 लि. गावठी दारु निर्मीतीचे रासायनिक द्रव व 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
वाशी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)आश्विनी दशरथ काळे, वय 30 वर्षे, रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव या दि.22.12.2023 रोजी 16.15 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या पाठीमागे अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तामलवाडी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)राजेंद्र गुलाब जाधव, वय 30 वर्षे, रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.22.12.2023 रोजी 20.00 वा. सु. पांगरधरवाडी येथे आपल्या शेतात अंदाजे 2,280 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.22.12.2023 रोजी 15.30 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत बिर्याणी गल्ली अश्विनी हॉटेलच्या बाजूला उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)भागानुर आण्णाराव काळशेट्टी, वय 34 वर्षे, रा. इंदीरानगर तांडुर जि. रंगारेड्डी ह.मु. बिर्याणी गल्ली उमरगा ता. जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. बिर्याणी गल्ली अश्विनी हॉटेलच्या बाजूला उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,040 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- जिवन लक्ष्मण कोकाटे, वय 50 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव हे दि.22.12.2023 रोजी 18.00 वा सुमारास शहाजीराजे चौक परिसर येडशी येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना धाराशिव ग्रामीण पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-विष्णु अच्युतराव पवार, वय 36 वर्षे, रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव यांचे पानगाव शिवारात शेत गट नं 26 मधील विहीरीवरील 15 सौर प्लेटा अंदाजे 24,710 ₹ किंमतीच्या या दि. 21.12.2023 रोजी 18.00 ते दि. 22.12.2023 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विष्णु पवार यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379, 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)उमाकांत शेषेराव भोसले,2)अक्षय उमाकांत भोसले, 3)संजय बाबुराव भोसले, 4) नागेश अशोक भोसले, 5) सविता उमाकांत भोसले, सर्व रा. वागदरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.12.2023 रोजी 18.00 वा .सु. गोपाळ पांडुरंग व्हंताळे रा. वागदरी यांचे घरासमोर अंगणात फिर्यादी नामे-उज्वला उर्फ फातिमा अब्दुल रब्बानी, वय 30 वर्षे रा. खडकी ता. दौंड जि. पुणे ह.मु. वागदरी ता. उमरगा जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन कुह्राडीचे तुंब्याने मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे पती व भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने, कुह्राडीचे तुंबाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- उज्वला उर्फ फातिमा अब्दुल रब्बानी यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) दिपक कोंडीबा उंबरे, 2) मिनाक्षी दिपक उंबरे, 3) निकीता रोहण उंबरे, 4) रोहण दिपक उंबरे सर्व रा. शिराढोण ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.12.2023 रोजी 08.30 वा. सु. शिराढोण येथे फिर्यादी नामे- संतोष बजरंग सोनवणे, वय 47 वर्षे, रा. शिराढोण ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी लक्ष्मी व मुलगा संकेत हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अमोल दराडे यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : मयत नामे-लालासाहेब हनुमंतराव झांबरे, वय 47 वर्षे, रा. सुर्डी ता. जि. धाराशिव हे दि.16.10.2023 रोजी 18.45 वा. सु. बेगडा पोहनेर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय वरुन धाराशिव कडे जात होते. दरम्यान आडगळे यांचे धाब्या जवळील वळणावर बेगडा शिवार येथे त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही स्लिप होवून लालासाहेब झांबरे हे खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी नामे- विजया लालसाहेब झांबरे, वय 45 वर्षे, रा. सुर्डी ता. जि. धाराशिव यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे-गणेश मारुती नरवाडे, रा. देगाव ता. देगलूर जि. नांदेड हे दि.21.10.2023 रोजी 18.30 वा. सु. आनंद भारती बाबा यांचे दिंडी सोबत घानगापुर येथे पायी चालत जात होते. दरम्यान लातुर ते उमरगा रोडवर माईल स्टोन 548(बी) कलबुर्गी 87 जवळ सावळसुर शिवार येथे आरोपी नामे- विश्वजीत सरवदे रा. रामपूर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 5273 ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून दिंडीमध्ये घुसवुन फिर्यादी, गणेश नरवाडे व इतर यांना गंभीर व किरकोळ जखमी झाले. या आपघातात गणेश नरवाडे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्याण मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादु पिराजी देवकर, वय 50 वर्षे, रा. आजणी, ता. बिलोली जि. नांदेड यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला