August 9, 2025

पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

  • धाराशिव (राजेंद्र बारगुले ) – जिल्ह्यात बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा म्हणून धाराशिव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर गडदेवदरी या निसर्गरम्य ठिकाणी नव्याने तगर भूमी बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली असून अनेक उपासकांनी या विहारासाठी कोणतेना कोणते दान देऊन पुण्य कर्म केले आहे. बौद्धांचे जागतिक नेते डाॅ.राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रविवार दि.७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा तगर भूमी येथे पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्य़ातील सर्व बौद्ध बांधवांना व भिमसैनिकांनी या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेस सहकुटुंब उपस्थित राहुण धम्म देसणेचा लाभ घ्यावा व परमपूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीचा रथ पुढे घेऊन जाण्यास तन ,मन ,धनाने सहकार्य करावे असे आवाहन संयोजक भंते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे.

error: Content is protected !!