धाराशिव (जिमाका) – नाताळ व नववर्षानिमित्त 24, 25 व 31 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) व एफएलबीआर-2 (बिअरशॉपी) या आस्थापना निर्धारित वेळेनंतर म्हणजेच रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल-3 (परवानाकक्ष), एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती) या आस्थापनांना निर्धारित वेळेनंतर म्हणजेच रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सीएल-3 अनुज्ञप्ती आस्थापनेस नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य