कळंब (राजेंद्र बारगुले) – तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. शाळेतील सहशिक्षक हनुमंत घाडगे यांनी संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. यावेळी घाडगे सर यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट अतूट नाते विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. स्वच्छतेचे आपल्या जीवनातील महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. आपण आपली शाळा आपला गाव परिसर ठेवला पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी कुमारी जानवी लालासाहेब शितोळे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने, सहशिक्षिका श्रीमती भारतीय सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन